Thu, Apr 25, 2019 18:22होमपेज › Belgaon › मोदी सरकारकडून चुकीच्या पद्धतीने आर्थिक व्यवस्थापन : मनमोहन सिंग 

मोदी सरकारकडून चुकीच्या पद्धतीने आर्थिक व्यवस्थापन : मनमोहन सिंग 

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 1:38AMबंगळूर : वृत्तसंस्था

नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनाच्या चुकीच्या पद्धतीचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. ‘जीएसटी’ आणि ‘नोटाबंदी’सारख्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून, त्याचा फटका छोट्या आणि मध्यम उद्योजकांना बसला आणि हजारो नोकर्‍याही गेल्या, याला केवळ मोदी सरकारच जबाबदार आहे, असा घणाघात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवरून नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरले.पेट्रोलच्या वाढलेल्या दरांमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. सतत टॅक्स वाढवत भाजप सरकारने इंधन दरांच्या माध्यमातून 10 लाख कोटींची कमाई केली, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे रोखीचा जो तोटा निर्माण झाला, तो टाळता आला असता. 

आमचे पंतप्रधान दावोसमध्ये पीएनबी घोटाळ्यामधील आरोपी नीरव मोदीबरोबर होते. काही दिवसांनंतरच नीरव मोदी देश सोडून गेला. नीरव मोदीचे 2015-16 पर्यंत काही तरी सुरू होते, हे स्पष्टच आहे; पण मोदी सरकारने काहीही केले नाही.