होमपेज › Belgaon › कार्यकर्त्यांची उठबस, प्रचाराची खलबते

कार्यकर्त्यांची उठबस, प्रचाराची खलबते

Published On: Apr 15 2018 1:34AM | Last Updated: Apr 15 2018 1:46AMबेळगाव :प्रतिनिधी

निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालये गजबजत आहेत. क्‍लब रोडवरील ग्रामीणच्या काँग्रेसच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची उठबस चालू झाली आहे. या ठिकाणी पूर्वीपासून काँग्रेसचे कार्यालय असल्याने निवडणूक काळात नवीन कार्यालय थाटण्यात आलेले नाही. मात्र आचारसंहिता असल्याने कार्यालयावर काँग्रेसच्या नेतमंडळीच्या फोटोसहीत लावण्यात आलेले फलक हटविण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे ग्रामीण मधून लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव निश्चीत झाल्याने दुसर्‍या इच्छुक उमेदवाराचा प्रश्‍नच  उद्भवत नाही. इतर पक्षांप्रमाणे ग्रामीण भागात एकापेक्षा अधिक उमेदवार काँग्रेसकडे तिकीट मागायला आलेच नाहीत. त्यामुळे लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्बत झाले आहे. 

यंदा निवडणूकीपूर्वी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव नेहमी चर्चेत राहिलेल्या अक्का लक्ष्मी हेब्बाळकर ग्रामीण मतदारसंघातून पुन्हा एकदा आपले नशीब आजमावणार आहे. मीण मध्ये प्रत्येक निवडणुकीत समिती, भाजप व काँग्रेस अशी त्रिशंकू लढत होत आली आहे. यंदा काँग्रेसचे कार्यकर्ते मोहन मोरे यांनी समितीकडे ग्रामीणमधून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केला आहे.

तर समितीचे युवा कार्यकर्ते परशराम बेळवटकर यांनी आपल्या समर्थकांसह निवडणूकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ग्रामीणमध्ये चुरस होणार आहे. काँग्रेस पक्षाचा निवडणुकीचा अजेंडा तयार असून रितसर एक खिडकी कार्यालयातून परवानगी मिळविण्यासाठी कार्यकर्ते कागदोपत्री पत्रव्यवहार करण्याच्या कामात गुंतले आहेत.

Tags : Workers , out of propaganda,belgaon news