Fri, Apr 19, 2019 12:19होमपेज › Belgaon › कराड-निपाणी रेल्वेलाईनचे काम मार्गी लावा

कराड-निपाणी रेल्वेलाईनचे काम मार्गी लावा

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 11:54PMनिपाणी : प्रतिनिधी

कराड-इचलकरंजी व्हाया निपाणीमार्गे बेळगाव रेल्वेलाईनचे काम मार्गी लावा, या मागणीचे निवेदन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना आ. शशिकला जोल्ले यांनी दिले. यावेळी खा. सुरेश अंगडी, आ.महांतेश कवटगीमठ, शशिकांत नाईक यांची उपस्थिती होती.  

एकसंबा येथे भाजप कार्यकत्यार्ंच्या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी ना. गोयल हे आले होते. कराड-निपाणी-बेळगाव रेल्वेसाठी आपण तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाही निवेदन दिले होते. यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचे आ. जोल्ले यांनी रेल्वे मंत्र्यांना सांगितले. निवेदनाचा स्विकार करून रेल्वेमंत्र्यांनी या मार्गाबाबत सहानूभूतीपूर्वक विचार करू असे आश्‍वासन आ. जोल्ले यांना दिले. यावेळी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले,  जि. पं. सदस्य सिद्धू नराटे, सुमित्रा उगळे, भाजप अध्यक्ष जयवंत भाटले, संजय शिंत्रे, ज्योतीप्रसाद व बसवप्रसाद जोल्ले आदी उपस्थित होते