Mon, Aug 26, 2019 09:17होमपेज › Belgaon › अपघातात महिला जागीच ठार

अपघातात महिला जागीच ठार

Published On: Dec 17 2017 1:30AM | Last Updated: Dec 16 2017 11:47PM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

निपाणी-उत्तूर मार्गावर नांगनूर पंचक्रोशी विद्यालयानजीक धोकादायक वळणावर कारचा टायर फुटल्याने, झालेल्या अपघातात शकुंतला सदाशिव चव्हाण (वय 58, मुळगाव म्हसोबा हिटणी, ता.हुक्केरी, सद्या मुंबई) या जागीच ठार झाल्या. तर अन्य चारजण जखमी झाले.  शनिवारी पहाटे 5.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

शकुंतला यांचे सासर हिटणी असून त्यांचे कुटूंब माहेर कडगाव येथे स्थायीक झाले आहे. कडगाव येथे आपल्या गावी नातेवाईकांना  भेटण्यासाठी योगेश मुंबईहुन  आई शकुंतला, पत्नी, मुले असे सातजण कारने येत होते. नांगनूरजवळ कारचा टायर फुटल्याने कार पलटी झाली. त्यात शकुंतला यांचा जागीच मृत्यू झाला. तर योगेशसह त्यांचे दाजी मारुती चव्हाण व अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले, अन्य तिघांना किरकोळ दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच संकेश्‍वर पोलिस घटनास्थळी गेले. त्यांनी जखमींना उपचारासाठी कोल्हापूरला हलविले. तर दुपारी शकुंतला यांच्या मृतदेहाचे विच्छेदन निपाणीतील म.गांधी रुग्णालयात केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

दुर्घटनास्थळी फौजदार एम.डी.मुल्ला, हावलदार उमेश माळगे यांनी भेट देवून पंचनामा केला. मयत शकुंतला यांच्या पश्‍चात  मुलगा, 2 मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.