Wed, Nov 14, 2018 08:03होमपेज › Belgaon › विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

Published On: May 06 2018 1:07AM | Last Updated: May 06 2018 12:27AMनिपाणी : प्रतिनिधी

ल्डर पिनचा शॉक बसल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कुर्ली येथे शनिवारी सकाळी 10  वाजण्याच्या सुमारास घडली. विमल युवराज गुरव (वय 45, रा. बेघर वसाहत, कुर्ली) असे तिचे नाव आहे.

विमल नेहमीप्रमाणे सकाळी विद्युत मोटारीद्वारे घरात पाणी भरत होत्या. पाणी भरून झाल्यानंतर मोटरीची होल्डरमध्ये असलेली पीन काढत असताना  विद्युत धक्का बसल्याने त्या बाजूला फेकल्या गेल्या. युवराज गुरव यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. शेजार्‍यांनी गुरव यांच्या घरी धाव घेतली. त्यानंतर निपाणी ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पीएसआय निंगनगौडा पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला.

दुपारी महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत विमल यांच्या पश्‍चात पती, दोन मुले असा परिवार आहे. युवराज गुरव यांनी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.