होमपेज › Belgaon › जुन्या योजना राहणारच : सिद्धरामय्या  

जुन्या योजना राहणारच : सिद्धरामय्या  

Published On: Jun 10 2018 1:47AM | Last Updated: Jun 09 2018 11:58PMबदामी : प्रतिनिधी

अन्नभाग्य योजनेसह काँग्रेस सरकारने अंमलात आणलेल्या सर्व योजना सुरू राहतील, असे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. 

सत्तेवर असताना आपण जनकल्याणाच्या अनेक योजना हाती घेतल्या. त्या योजनांची पूर्तता संयुक्त सरकारही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना सवलतीत बस देण्याची योजना अंमलात आणण्यात येत आहे. यासंदर्भात युती सरकारच्या समन्वय समितीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. राज्यात संयुक्‍त सरकार असले तरी अन्नभाग्य, क्षीरभाग्य, इंदिरा कँटीन या योजनांसह सर्वच भाग्य  योजना पुढे चालू ठेवण्यात येतील. 

दूध उत्पादकांना प्रोत्साहन धन देण्यासंदर्भातही समन्वय समितीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. राजकारण केवळ निवडणूकीपुरता त्यानंतर आपण सारे लक्ष विकासकामाकडे केंद्रीत केले आहे. बदामी मतदार संघाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बदामीमध्ये 11 जून रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठकीमध्ये सर्व विषयावर चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहेत.