Thu, Aug 22, 2019 12:30होमपेज › Belgaon › चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 06 2018 12:22AMबेळगाव : प्रतिनिधी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नी नयना अमित शटवे (वय 20) हिचा गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी भारतनगर पहिला क्रॉस येथे उघडकीस आली. याप्रकरणी नयनाच्या मोठ्या बहिणीने शहापूर पोलिसांत फिर्याद दिली. पती अमितला अटक करण्यात आली आहे. अमित महादेव शटवे (वय 24, रा. शहापूर) व नयना (मूळ रा. पाटील गल्ली) यांचा वर्षभरापूर्वी प्रेमविवाह  झाला होता. त्यानंतर ते भारतनगर पहिला क्रॉस येथे भाडोत्री घरामध्ये राहत होते. अमित गवंडी कामगार आहे. 

बुधवारी सकाळी बराच वेळ अमितच्या घराचा दरवाजा बंद असल्याचे निदर्शनास आल्याने शेजार्‍यांनी चौकशी केली असता  खून झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. शहापूर पोलिस निरीक्षक मृत्युंजय व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. 

दरम्यान, लेडीज बॅगच्या बंधाने गळा आवळून नयनाचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिस तपासातून पुढे आला आहे. मंगळवारी रात्री 10 ते बुधवारी सकाळी 9 च्या दरम्यान हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला.  घटनास्थळी तहसीलदार जक्‍कण्णागौडर भेट देऊन पाहणी केली. अमितला अटक झाली आहे. शहापूर पोलिसानी तपास चालविला आहे. 

Tags : belgaum, belgaum news, Wife murder, character suspicion,