Thu, Apr 25, 2019 23:28होमपेज › Belgaon › तवंदी घाटातील अपघातसत्र थांबणार कधी?

तवंदी घाटातील अपघातसत्र थांबणार कधी?

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jun 30 2018 11:04PMनिपाणी : मधुकर पाटील 

तवंदी घाट ते कोगनोळी या 30 कि.मी. टापूत केंद्र सरकारच्या  बांधकाम विभागाने 100 ठिकाणे ही ब्लॅक स्पॉट निश्‍चित केली आहेत. या टापूत गेल्या वर्षभरात विविध अपघातात किमान 27 जणांचा बळी गेला आहे.  यामध्ये गेल्या सहा महिन्यात तवंदी घाट टापूत 7 जणांना प्राण गमवावा लागला आहे.त्यामुळे तवंदी घाटातील अपघात पाचवीलाच पूजलेला आहे. भरधाव वेग याला कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. सातत्याने घडणार्‍या अपघातांमुळे पोलिस प्रशासनासह पुंजलॉईड कंपनीची डोकेदुखी वाढली आहे.

2004 साली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे काम पुंजलॉईड या कंपनीकडून चांगल्या प्रकारे झाले आहे. या कंपनीने होनगा ते कोगनोळी या 77 कि.मी. अंतरात दुसर्‍यांदा नव्याने डांबरीकरण केले आहे. गेल्या वर्षभरात तवंदी ते कोगनोळी या टापूत 35 दुचाकींसह 15 लहान- मोठी वाहने बाजूपट्ट्यावरून घसरून पडल्याने तसेच धडक झाल्याने 27 जणांचा मृत्यू झाला. तसेच काहींना अपंगत्व आले आहे. 

बाजूपट्ट्या व अपघाती जागा म्हणून निश्‍चित केलेल्या किलर स्पॉटच्या ठिकाणी रस्ते बांधकाम कंपनीने वेगवेगळ्या उपयायोजना करूनही वाहनधारकांनी खबरदारी घेतलेली नाही.  वरील 77 कि.मी.अंतरात महामार्ग सुरक्षितपणे ओलांडता यावा, यासाठी अनेक ठिकाणी लहान-मोठे सुमारे  50 भुयारी मार्ग बांधले आहेत. मात्र याचा आजही अनेक वाहनाधारकांकडून वेळ व फेरी वाचविण्याच्या प्रयत्नात वापर होताना दिसत नाही. 

अनेक उपद्व्यापी वाहनधारके कोणत्याही ठिकाणावरून वाहने मुख्य रस्त्यावर आणत आहेत. यामुळेच  वारंवार  होणार्‍या अपघाती घटनामुळे अशी ठिकाणेच दुचाकी व इतर वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहेत. 2004 ते 2019 पर्यंत या राष्ट्रीय महामार्गाची जबाबदरी घेतलेल्या ही कंपनी प्रवाशांना चांगली सेवा देत आहे. याला सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.