Sat, Jun 06, 2020 07:47होमपेज › Belgaon › फॅन्सी नंबरप्लेट  दुचाकींवर कारवाई कधी?

फॅन्सी नंबरप्लेट  दुचाकींवर कारवाई कधी?

Published On: Apr 18 2018 12:47AM | Last Updated: Apr 17 2018 9:26PMबेळगाव : प्रतिनिधी

शहर-उपनगरांत अनेक तरुण आणि नागरिकांकडून फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या दुचाकींचा सर्र्‍हास वापर केला जात आहे. या दुचाकीचा वापर करून अनेक गैरकृते होत आहे. त्यामुळे अशा दुचाकीस्वारांवर कारवाई कधी होणार? असा सवाल उपलब्ध होत आहे. दादा, मामा, अण्णा, आशीर्वाद अशा शब्दांच्याच नंबरप्लेट असणार्‍या

अलिकडे तरुणाईकडून अनेक गैरकृत्ये होत आहेत. भरधाव वेगाने वाहने चालवून शेजार्‍यांना जखमी करून पळून जाण्याचे प्रकार घडत आहेत. शहर परिसरात चेन स्नॅचिंगचे प्रकारही वाढले आहेत. यासाठी विनानंबर प्लेट असणार्‍या दुचाकींचाच वापर होत आहे. रात्री-अपरात्री चोर्‍या करण्यासाठी प्रामुख्याने अशा दुचाकींचा वापर होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. काही महिन्यापूर्वी शहर परिसरात इराणी टोळीने चेन स्नॅचिंग करून धुमाकूळ घातला होता. यातील सर्व संशयित आरोपींची दुचाकी चालविण्याची धूमस्टाईल निदर्शनास आली आहे. 

देशमुख रोड आरपीडी क्रॉस, शहापूर, किर्लोस्कर रोड, न्यू गांधीनगर, मिलन हॉटेल, फोर्ट रोड, अनगोळ चौथा गेट या परिसरात अशा दुचाकींचा वापर मोठ्याप्रमाणात सुरू आहे. काही कॉलेज आवारात महाविद्यालयीन तरुणींची छेड काढणार्‍या तरुणांकडून विनानंबर प्लेट दुचाकींचा वापर होत आहे. अशा रोड रोमियावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. काही दुचाकी 15 वर्षापूर्वीपासून वापरात आहेत.
Tags : fancy numberplate ,action ,against two-wheelers,belgaon news