Sun, Jul 21, 2019 17:04
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › बारावी परीक्षा मूल्यमापन मोबदला कधी?

बारावी परीक्षा मूल्यमापन मोबदला कधी?

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 02 2018 10:25PMबेळगाव : प्रतिनिधी

बारावीच्या 2017-18 च्या उत्तरपत्रिका तपासणी (मूल्यमापन) केलेल्या प्राध्यापकांना तीन महिने उलटले तरी राज्यातील सुमारे 12 हजार प्राध्यापकांना भत्ताच खात्यावर जमा केलेला नाही. यामुळे विनाअनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांची मोठी अडचण झाली आहे. बारावीची पुरवणी परीक्षा 29 जूनपासून सुरू झाली आहे. या पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्याची तयारी केली जात आहे. 
पेपर तपासल्यानंतर प्राध्यापकांना यापूर्वी धनादेश दिला जात होता. पदवीपूर्व शिक्षण खात्याने आरटीजीएस करून  थेट प्राध्यापकांच्या खात्यावर पेपर तपासणीचा निधी जमा करू, सांगितले होते. काही प्राध्यापकांच्या खात्यावर जमा आहेत. मात्र काहींना मिळालेले नाहीत. त्यामुळे पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या कारभारवर प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

बारावी पेपर तपासणी मार्चमध्ये पूर्ण झाली. सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी पेपर तपासणी वेळेत पूर्ण करून दिली. मात्र विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक कमी वेतनात अध्ययन करत आहेत. त्यांना हॉटेल, प्रवास खर्च आदीमुळे मोठा खर्च करावा लागतो. सदर प्राध्यापकांचे वेतन तीन महिने उलटले तरी जमा झालेले नाही. प्राध्यापकांनी विज्ञान, कला व वाणिज्य विभागातील निकाल वेळेत लावला आहे. प्राध्यापकांना सकाळच्या सत्रात 12 व दुपारच्या सत्रात 12 पेपरची तपासणी करावी लागते. दिवसभरात 24 पेपर तपासून संपूर्ण माहिती एकत्रित करून केंद्र प्रमुखाकडे द्यावी लागते. ही  जबाबदारी मोठी असते. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सुमारे तीन हजार प्राध्यापक विविध भागातून पेपर तपासणीसाठी येतात.  आरटीजीएसची पैसे भरलेली पावती देणार होते. मात्र अजूनही काहीच हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे यापूर्वीची जुनीच पद्धत बरी होती. प्राध्यापकांना धानादेश दिला जात होता. त्यानंतर प्राध्यापका आपल्या खात्यावर धनादेश जमा करीत होते. पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या गोंधळामुळे प्राध्यापकांना भुदर्ंड बसला आहे. प्राध्यापकांना  दिवसाला 24 पेपरचे 648 रुपये भत्ता मिळतो. 

शिक्षण संचालकांशी चर्चा

शिक्षण खात्याच्या कारभारावर कमलापूर सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य दयानंद कित्नाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  बारावी पुरवणी परीक्षेवर प्राध्यापकांनी बहिष्कार घालण्याचा विचार चालवला आहे. त्यासंदर्भात पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालिका सी. शिखा यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. लवकर पेपर तपासणीचा निधी जमा केला जाईल.