Mon, Aug 19, 2019 11:56होमपेज › Belgaon › पीओपीसह समस्यांवर बैठक कधी?

पीओपीसह समस्यांवर बैठक कधी?

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 25 2018 1:13AMबेळगाव : प्रतिनिधी

गणेशोत्सव 20 दिवसांवर येऊन ठेपला, तरी शहरातील समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय बैठक न झाल्यामुळे ती तातडीने बोलवावी, असा आग्रह शुक्रवारी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने महापौरांकडे धरला. खड्डेमय रस्ते, खंडित वीज या पारंपरिक समस्यांसह यंदा पीओपी मूर्तींचा प्रश्‍न तीव्र झाला आहे. पीओपी मूर्ती जप्त करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला असून, त्यासाठी मूर्तींची पाहणीही सुरू झाली आहे. त्यामुळे मूर्तिकारांसह सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारीही धास्तावले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर मध्यवर्ती महामंडळाने, महापौरांनी पुढाकार घेऊन गणेशोत्सवापूर्वी उदभवणार्‍या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्व खात्याच्या अधिकार्‍यांना एकत्र करुन प्रशासकीय बैठक बोलावावी अशी मागण महापौर बसाप्पा चिकलदिन्नी यांच्याकडे केली.रस्त्यांची डागडुजी करणे गरजेचे आहे. काँक्रीटीकरण, पेव्हर्स घालून दुरुस्ती व्हावी, पथदीप बंद आहेत, वीजतारा लोंबकळत आहेत, फांद्या धोकादायक बनल्या आहेत अशा समस्या महामंडळाने मांडल्या. .भेटीप्रसंगी कार्याध्यक्ष  रमाकांत कोंडूसकर, जनसंपर्क अधिकारी विकास कलघटगी, रणजीत चव्हाण- पाटील, मदन बामणे, मेघन लंगरकांडे,  शिवराज पाटीलसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.