Sun, Jul 21, 2019 07:47होमपेज › Belgaon › स्वामी समर्थ पालखीचे चिदंबरनगरात स्वागत

स्वामी समर्थ पालखीचे चिदंबरनगरात स्वागत

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 10 2018 12:13AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी 

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांची पालखी येथे विसाव्याला आहे. शहरात विविध मार्गावरून प्रयाण करून मंगळवारी दि.9 रोजी चिदंबरनगर येथे दाखल झाली. यावेळी सुमारे पाच हजार भाविकांच्या उपस्थित पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. 

पालखीचे पूजन निमंत्रक सचिन सदानंद सांबरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आला असून चोहोबाजूनी रांगोळ्या टाकून परिसर सुशोभित केला होता. यावेळी आरती करण्यात आली. अनगोळ नाका मेन रोड स्वामी विवेकानंद मार्गावरून पालखी सचिन सांबरेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाली. बेळगाव शहरासह, उपनगरातील सुमारे पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.  भजनीमंडळ व बसवाणेप्पा बँडच्या गजरात पालखी पुन्हा शहराकडे  मार्गस्थ झाली.