Thu, Feb 21, 2019 01:42होमपेज › Belgaon › मतदान ओळखपत्र नव्हे ही तर लग्‍नपत्रिका!

मतदान ओळखपत्र नव्हे ही तर लग्‍नपत्रिका!

Published On: May 10 2018 8:56AM | Last Updated: May 10 2018 8:53AMहावेरी : प्रतिनिधी

आपले लग्न हटके व्हावे, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करावे म्हणून अनेक प्रकार केले जातात. लग्नपत्रिका छापण्यापासून ते लग्नाच्या वरातीपर्यंत वेगवेगळे फंडे वापरले जातात. आता कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका दाम्पत्याने आपली लग्नपत्रिका मतदान ओळखपत्रासारखी छापली आहे. त्या माध्यमातून मतदान जनजागृतीचा प्रयोग त्यांनी केला.

हावेरी जिल्यातील एका दाम्पत्याने निवडणुकीच्या हंगामात लग्न जुळल्यानंतर आपली लग्नपत्रिका हटके छापली. सिध्दप्पा दोड्डचिक्‍कन्‍नावर आणि त्यांची पत्नी ज्योती यांनी मतदार पत्रासारखे हुबेहूब दोघांचे कार्ड छापले. आपले नातलग आणि मित्रांना 12 रोजी मतदान करण्यास हा प्रयोग उपयुक्‍त ठरेल, असे त्यांना वाटते. यासाठी  हावेरी जिल्हाधिकार्‍यांकडून अनुमती घेतल्याचे या दाम्पत्याने सांगितले.

मतदान कार्डवर छायाचित्राच्या जागी या दोघांचे फोटो आहेत. तर मतदाराच्या नावाऐजी त्या दोघांची नावे आहेत. मतदान ओळखपत्राच्या मागच्या बाजूला आपला पत्ता असतो त्याठिकाणी विवाह स्थळ, मुहूर्त छापण्यात आला आहे. 

Tags : karnataka, Election, 2018, campaign, Voter, ID, Wedding, Invitation