Tue, Jul 07, 2020 06:07होमपेज › Belgaon › येडियुरप्पांनी 'त्या' निर्णयावर फक्त काही तासांमध्येच मारली कलटी!

येडियुरप्पांनी 'त्या' निर्णयावर फक्त काही तासांमध्येच मारली कलटी!

Last Updated: May 27 2020 2:47PM
बंगळूर : पुढारी ऑनलाईन

देशभरात कोरोनाचा फैलाव सुरुच असल्याने देशभरातील मंदिर, मशिद तसेच चर्च बंद आहेत. त्यामुळे सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे कोरोनामुळे बंदच आहेत. असे असतानाच कर्नाटकात येडियुरप्पा सरकारने मोठा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी आज (ता.२७)  मंदिर, मशिद तसेच चर्च सुरु करणार असल्याची घोषणा केली.  

अधिक वाचा : दहावी परीक्षेविरोधात मराठा मंडळ न्यायालयात

या निर्णयानंतर त्यांनी अवघ्या काही तासांमध्येच कलटी मारत निर्णय फिरवला आहे. त्यांनी आता मंदिर, मशिद तसेच चर्च सुरु करणार नसल्याचे म्हटले आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचे त्यांनी निर्णयावरून कलटी मारताना सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 

अधिक वाचा : आता अथणी तालुका हॉट स्पॉट