Tue, Jul 16, 2019 12:30होमपेज › Belgaon › वळीव पावसामुळे डोळ्यांत पाणी

वळीव पावसामुळे डोळ्यांत पाणी

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 14 2018 1:11AMबेळगाव : प्रतिनिधी

वळीव पावसामुळे बागायतदार शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. तालुक्यासह जिल्हात वळिवामुळे बागायत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. बेळगाव तालुक्यातील पश्‍चिम भागात काजू, चिकू, आंबे यांचे क्षेत्रही मोठे आहे.  मात्र गारांसह पडलेल्या वळिवामुळे मोठा फटका बसला आहे. 

गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तर काही दिवसांनी अधूनमधून पाऊस पडत आहे. काजू, आंब्याच्या फळावर गारा पडून काळे डाग पडत आहे. शिवाय मोहोर खराब होत आहे. सध्या फळधारणेचा काळ असल्याने बदलत्या हवामानाचा मोठा परिणाम होत आहे. यातच अधूनमधून दाट धुक्यामुळे काजू, चिकूसह आंब्याचा मोहोर जळून गेला आहे. काजूचा पाला गळून पडल्याने उत्पादनात अधिकच घट होत आहे. 

ग्रामीण भागात कोंथिबीर पिकालाही मोठा फटका बसला आहे. गारा पडल्याने उभे पीकच आडवे झाले आहे. बसवण कुडची परिसरात कोथिंबीरचे मोठे नुकसान झाले आहे  शुक्रवारी  पहाटे मोदगा, बाळेकुंद्री, पतबाळेकुंद्री, सांबरा, मुतगा, निलजी, बसवणकुडची या परिसरात मोठा पाऊस पडला. त्यामुळे भाजीपाल्यावरही किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. कणबर्गी, हुदली, कलखांब या परिसरात आंब्यांचे मोठे उत्पादन आहे. मात्र धुक्याने मोहोर जळून गेला आहे.तसेच फळेही गळून पडली आहेत. 

शेतकर्‍यांनी काही सुधारित जातीच्या आंबा झाडांची लागवड केली आहे. मात्र बदलत्या हवामानाने अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. या दिवसात मुसळधार पाऊस काजूला लाभदायक असतो. पण धुके, गारा पडल्याने, मोहोर खराब होत आहे. यंदा एक महिना काजू उत्पादन लांबणीवर पडले आहे.

Tags :Water in eye, adverse rain,belgaon news