Tue, Apr 23, 2019 19:36होमपेज › Belgaon › पाच जिल्ह्यांत वॉच

पाच जिल्ह्यांत वॉच

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 18 2018 1:57AMबेळगाव : प्रतिनिधी

तीन राज्यांच्या सीमेवरील गुन्हेगारी आणि त्याचबरोबर आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. उत्तर कर्नाटकातील पाच जिल्ह्यांत संवेदनशील, अतिसंवेदनशील व सामान्य अशा प्रकारच्या 35 चेकपोस्टद्वारे हालचालींवर नजर राहणार आहे, अशी माहिती उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक अलोककुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शनिवारी बेळगावच्या सरकारी विश्रामधामात महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीला अलोककुमार यांच्यासह कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, बेळगावचे पोलिस आयुक्त डी. सी. राजप्पा, कोल्हापूरचे जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते, कोल्हापूर जिल्हा पोलिसप्रमुख सोहेल शर्मा, गोवा उत्तर विभागाचे जिल्हा पोलिस प्रमुख चंदन चौधरी यांच्यासह उत्तर कर्नाटकातील पाच जिल्ह्यांतील जिल्हा पोलिस प्रमुख बैठकीला उपस्थित होते.

बैठकीसंदर्भात अधिक माहिती देताना अलोककुमार म्हणाले, तिन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात वाळू तसेच शस्त्रांची तस्करी त्याचबरोबर सुपारी किलरांची ये-जा होत आहे. म्हादई प्रश्‍नावरून वारंवार अशांतता निर्माण होत आहे.