Mon, Feb 18, 2019 04:33होमपेज › Belgaon › तिहेरी खून प्रकरणामध्ये तपास अधिकार्‍यावर वॉरंट

तिहेरी खून प्रकरणामध्ये तपास अधिकार्‍यावर वॉरंट

Published On: Dec 01 2017 12:38AM | Last Updated: Dec 01 2017 12:38AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

कुवेंपूनगर येथील विवाहिता रिना मालगत्ती व तिच्या दोन मुलांची निर्घृणपणे हत्या केल्याचा खटला आरोपी प्रवीण भट याच्यावर चाललेला आहे. या प्रकणातील तपास अधिकारी शंकरगौडा पाटील उलटतपासणीला हजर राहिले नसल्याने द्वितीय अतिरिक्‍त  जिल्हासत्र न्यायाधीश एम. एच. अन्‍नण्णावर यांनी त्यांच्यावर गुरुवारी अटक वॉरंट बजाविले. 

पोलिस निरीक्षक शंकरगौडा पाटील यांची या खटल्यामध्ये मागील तारखेला शेवटची साक्ष नोंदविण्यात आली. गुरुवारी त्यांची आरोपीचे वकील अ‍ॅड. प्रवीण करोशी उलटतपासणी करणार होते. परंतु, ते गैरहजर राहिल्याने न्यायाधीशांनी त्यांच्यावर अटक वॉरंट बजाविले आहे. खटल्याची पुढील सुनावणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे.