Thu, Jun 20, 2019 06:29होमपेज › Belgaon › निपाणीला नगरोत्थान कामांची प्रतीक्षा

निपाणीला नगरोत्थान कामांची प्रतीक्षा

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 19 2018 9:00PMनिपाणी : प्रतिनिधी

निपाणी शहराला राज्य शासनाकडून नगरोत्थान विकास योजनेतून 21 कोटी 25 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यातून रस्ता डांबरीकरणावर सर्वच वॉर्डातील रस्त्यांवर 11 कोटी 75 लाखांचा निधी खर्च होणार आहे. कामाची निविदा काढण्यात आली असून आता नागरिकांना कामाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

एससी निधीतून वॉर्ड 23 मध्ये आंबेडकरनगरात पाणीपुरवठा योजना, रस्ता, वॉर्ड  9 मधील हरिजन गल्लीतील मुख्य रस्ता ते स्मशानपर्यंत रस्ता डांबरीकरण, वॉर्ड 22 भीमनगर व वॉर्ड  24 मधील बौद्धनगर, जामदार प्लॉट, सिद्धार्थनगर व थळोबा पेठ येथे रस्ता डांबरीकरण, वॉर्ड 26 मधील डोंबारी वसाहतीत रस्ता सुधारणा, वॉर्ड क्रं. 23 मधील आंबेडकरनगरात रस्ता, गटारी निर्मिती, वॉर्ड क्रं. 23 मधील आंबेडकरनगरात काँक्रिट रस्ते व वॉर्ड क्र. 7 मधील रामनगर वड्डर गल्ली कॉलनीत रस्ते व गटारींसाठी निधी खर्चण्यात येणार आहे.

वॉर्ड  8 मधील आंबेडकर सर्कल, मांगवाडा, वाल्मिकीनगर व ढोर गल्लीतील अंतर्गत रस्ते डांबरीकरण, वॉर्ड क्र.4 मधील आश्रयनगर, शाहूनगर, संभाजीनगर व वॉर्ड क्रं. 5 मधील संभाजीनगर, आश्रय संभाजी नगरातील रस्ते डांबरीकरण, वॉर्ड 8 व 9 मधील जत्राटवेस,आंबेडकर नगरातील अंर्तगत रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे.

जवाहरलाल तलावाच्या दगडी पिचिंग कामासाठी 20 लाख रूपयांची तरतूद आहे. जुन्या पी. बी. रोडचे डांबरीकरण, वॉर्ड 1 मधील मराठा मंडळ, आयएमए हॉल, वॉर्ड क्रं. 2 मधील प्रतिभानगरातील रस्ते, वॉर्ड  3 मधील श्रीनगर, बसवाणनगर, संभाजीनगरातील अंर्तगत रस्ते वॉर्ड  7 मधील रामनगर, अष्टविनायकनगर, साईशंकरनगर, एसटी कॉलनी, हुडको कॉलनी, सोमनाथनगर, निंबाळकर कॉलनी व सावंत कॉलनीतील रस्ते डांबरीकरण, वॉर्ड क्र. 10मधील अथणी दवाखाना, वॉर्ड क्रं. 13 मधील हणबर गल्ली, 11 मधील सटवाई रोड, वॉर्ड क्रं. 12 मधील दत्त गल्ली, तेली गल्ली, दिवाणजी गल्लीतील रस्ता, वॉर्ड  17  व 18 मधील रस्ता, वॉर्ड क्रं. 19, 20 व 22 मधील रस्ताकाम, वॉर्ड क्रं. 21 मधील जामदार प्लॉटमधील रस्ता, वॉर्ड 25 व 26 मधील रस्ता, वॉर्ड क्रं. 27 व 28 मधील रस्ते, वॉर्ड क्रं. 29, 30 व 31 मधील रस्ता, वॉर्ड क्रं. 6 मधील रस्तेकामासाठी निधी  खर्च करण्यात येणार आहे.  निविदा मंजूर झाल्यावर ही कामे मार्गी लागणार आहेत.  

मार्चमध्ये विकासकामांना सुरूवात होणार

मंजूर  निधीपैकी  शेकडा 17.15 टक्के म्हणजे 4 कोटी 2 लाखांचा निधी एससी समाज वस्तीमध्ये तर शेकडा 6.95 टक्के म्हणजे 1 कोटी 61 लाखांचा निधी एसटी समाज वस्तीमध्ये खर्च केला जाणार आहे. या कामाची निविदा काढण्यात आली असून 16 फेबु्रवारीपर्यंत भरण्याची मुदत आहे. मार्च महिन्यात या विकासकामांना सुरूवात होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर व पालिका अभियंता पी. जे. शेंडूरे यांनी दिली.