Tue, Jul 16, 2019 10:21होमपेज › Belgaon › मतदारांना आज इंधन एक रुपयाने स्वस्त

मतदारांना आज इंधन एक रुपयाने स्वस्त

Published On: May 12 2018 1:26AM | Last Updated: May 11 2018 11:24PMबेळगाव : प्रतिनिधी

मतदान जागृतीसाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बेळगाव विभागातील 30 पेट्रोल पंपावर एक रुपये कमी दराने पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. याचा प्रारंभ कॉलेज रोडवरील शानभाग पेट्रोल पंपावर करण्यात आला. 

मुख्य विभागीय व्यवस्थापक संदीप रेड्डी यांच्या हस्ते फीत कापून योजनेचा प्रारंभ करण्यात आला. मुख्य व्यवस्थापक एस. एम. मशाळडी, राहुल शानभाग, विक्री अधिकारी शलाका गिरी आदी उपस्थित होते. 

शनिवारी (दि.12) सकाळी 8 ते रात्री 6 पर्यंत विभागातील 30, जिल्ह्यातील 10 आणि शहरातील 4  पेट्राल पंपावर एक रुपये कमी दराने पेट्रोल देण्यात येणार आहे. दुचाकी ते चारचाकीपर्यंतच्या वाहनांसाठी ही सुविधा असणार आहे. 100 रुपयांच्या पेट्रोलवर पहिल्या शंभर ग्राहकांसाठी ही सुविधा असणार आहे. मतदान केल्यानंतर बोटावरील शाई दाखवून स्वस्त इंधन घेऊ शकता, असे आवाहन करण्यात आले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीदेखील हा उपक्रम राबविणार आहे. 

संदीप रेड्डी म्हणाले, राज्यात शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान जागृतीसाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. एस. एम. मशाळडी यांनीही माहिती दिली. शलाका गिरी यांनी सूत्रसंचालन केले.