Fri, Apr 26, 2019 03:23होमपेज › Belgaon › राणी चन्‍नम्मा स्फूर्तीचे प्रतीक

राणी चन्‍नम्मा स्फूर्तीचे प्रतीक

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 11:30PMयेडूर : वार्ताहर

राणी चन्‍नम्मांनी ब्रिटिशांच्या विरोधात चळवळ उभी करून देशाला गुलामगिरीतून मुक्‍त केले. वीरराणी चन्‍नम्मा सार्‍यांसाठी स्फूर्तीदायी आहेत, असे विचार मान्यवरांनी आज मांडले. येडूर (ता. चिकेाडी) येथे विविध मठाधीश आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत येथील युवा जागृती बळग व ग्रामस्थांच्या वतीने वीरराणी कित्तूर चन्‍नम्मा पुतळा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

जगद‍्गुरु डॉ. चनसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी श्रीशैल येडूर यांची मुख्य उपस्थित होती.नेतृत्त्व पंचम शिवलिंगेश्‍वर महास्वामी निडसोसी यांनी केले. यावेळी सुगुरेश्‍वर शिवाचार्य स्वामी, शहापूर महांत स्वामी शेगुणशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रकाश हुक्केरी होते. उद्घाटक म्हणून खा. प्रभाकर कोरे, प्रमुख पाहुणे म्हणून आ. गणेश हुक्केरी, आ. महांतेश कवटगीमठ, अभिनेत्री शिल्पा रहीमठ, वक्त्या म्हणून सुवर्णाताई होसमठ जि.पं. सदस्या भारती पवार, ता.पं. सदस्य पांडुरंग कोळी, ड‘ीकेएसएसके’चे उपाध्यक्ष सुभाष कात्राळे उपस्थित होते.

खा. कोरेंंच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सकाळी 7 वा. रवींद्र जडे व पोपट करोशी या दाम्पत्याकडून मूर्ती प्रतिष्ठापना पूजा आणि नवग्रह होम हा धार्मिक कार्यक्रम झाला. प्रास्ताविक जागृती बळगचे अध्यक्ष ग्रा.पं. अध्यक्ष अमर बोरगावे यांनी केले. पंचम शिवलिंगेश्‍वर स्वामी व विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. खा. कोरे म्हणाले,  पुतळा अनावरणाने येडूर गावाला स्फूर्ती मिळाली आहे. 

खा. हुक्केरी म्हणाले, युवा कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून येडूरसारख्या खेडेगावात राणी चन्‍नम्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. इतिहास युवकांना माहीत व्हावा, यासाठी युवकांनी जागृती करावी. 

शिवलिंगेश्‍वर स्वामी म्हणाले, कर्नाटकातील इतिहासात येडूर येथील युवकांनी दोन राजकीय व्यक्‍तींना घेऊन चन्‍नम्मा पुतळा अनावरणाचे चांगले काम केले आहे.  श्रीशैल जगद‍्गुरु स्वामींनी विचार मांडले. सुवर्णाताई होसमठ यांनी  राणी चन्‍नम्माच्या चरित्राचा आढावा घेतला. आ. गणेश हुक्केरी, महांत स्वामी, शिल्पा रहीमठ यांनीही विचार मांडले.

अनिल पाटील, अजित देसाई, शिवानंद करोशी, दादू कागवाडे, पांडू घाटगे, अजित पाटील, रणजित देसाई, संजय पाटील, रवि मिरजे, चेतन पाटील, सदाशिव बेळवी, अजय सूर्यवंशी, ता.पं. प्रभाकर भीमण्णवर, मल्लेश कागवाडे, जयपाल बोरगावे, अशोक जमदाडे, सिदू मगदूम, राजू इकारे, भीमगौडा पाटील उपाध्यक्ष प्रशांत उमराणे, दिलीप उमराणे उपस्थित होते. सुगुडेश्‍वर स्वामी यांनी सूत्रसंचालन तर अमर बोरगावे यांनी आभार मानले.