Thu, Feb 21, 2019 21:20होमपेज › Belgaon › येत्या वर्षभरात २५०० शाळांचे उन्‍नतीकरण

येत्या वर्षभरात २५०० शाळांचे उन्‍नतीकरण

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 15 2018 8:56PMबेळगाव : प्रतिनिधी

येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील 2500 सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे उन्नतीकरण करण्यात येणार असून या शाळांना वरचा वर्ग जोडण्यात येणार आहे. याद्वारे पहिली ते पाचवी वर्ग असणार्‍या एक हजार कनिष्ठ प्राथमिक शाळांना सहावीचा वर्ग, पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असणार्‍या 500 उच्च प्राथमिक शाळांना आठवीचा वर्ग जोडण्यात येईल, तर आठवी ते दहावी वर्ग असणार्‍या 500 माध्यमिक शाळांमध्ये पदवीपूर्व विभाग सुरू करण्यात येणार आहेत.

सध्या प्राथमिक शाळांमध्ये 1 लाख 3 हजार शिक्षकांची गरज असून प्रत्यक्षात मात्र 1 लाख 52 हजार 630 शिक्षक सेवेत आहेत. यामधील पदवीधर आणि अतिरिक्त शिक्षकांना गरजेनुसार उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये  सामावून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये केवळ समायोजन होणार असल्याने नव्या शिक्षक भरतीचा भार सरकावर पडणार नाही.