Thu, Jul 18, 2019 04:45होमपेज › Belgaon › एकरूप शुल्क-वेळापत्रकाचा विद्यापीठांना विसर

एकरूप शुल्क-वेळापत्रकाचा विद्यापीठांना विसर

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 9:50PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील सर्व विद्यापीठांसाठी एकच वेळापक आणि शुल्कासाठी नियम जारी करण्यात आला  होता. मात्र, बहुतेक विद्यापीठांकडून त्याचे उल्‍लंघन होत आहे.गतवर्षी उच्च शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांयाच्या हिताच्या दृष्टीने एकरूप शैक्षणिक दिनक्रम आणि आणि शुल्क आकारण्याची सूचना दिली होती. तसा नियम जारी झाला. मात्र, त्याचे पालन होत आहे की नाही याची पाहणी करण्याचे कष्ट शिक्षण खात्याने घेतले नाहीत. त्यामुळे बहुतेक विद्यापीठांकडून आदेशाचे उल्‍लंघन होत आहे. राज्यात एकूण 27 विद्यापीठे असून ही विद्यापीठे स्वतःच्या अनुकूलतेनुसार प्रवेश, परीक्षा, मूल्यमापन करत आहेत. यामुळे एकरूप पद्धतीचा स्वीकार करण्याची मानसिकता नसल्याचे दिसून येते.

एकरूप पद्धतीनुसार राज्यातील सर्व पदवी महाविद्यालयांनी पहिल्या दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षातील (1, 3, 5 वे सेमिस्टर) वर्ग 15 ते 30 जूनपर्यंत सुरू करणे आवश्यक आहे. मात्र, बहुतेक विद्यापीठांनी या नियमाचा उल्‍लंघन केला आहे. बंगळूर विद्यापीठाने 1, 3, 5वे सेमिस्टरचे वर्ग 2 जुलैपासून सुरू होत असल्याची अधिसूचना जारी केली आहे. इतर विद्यापीठांपेक्षा पंधरा दिवस विलंबाने या विद्यापीठाचे वर्ग सुरू होत आहेत. यामुळे अभ्यासक्रमात इतरांपेक्षा हे विद्यापीठ मागे पडणार आहे.

पदव्युत्तर वर्ग 15 जुलैपासून प्रारंभ होण्याची गरज आहे. मात्र, बहुतेक विद्यापीठांनी आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेसंबंधी अधिसूचना जारी केलेली नाही. विद्यापीठांकडून आपापल्या इच्छेनुसार शुल्क आकारणी सुरू केली आहे. धारवाडमधील कर्नाटक विद्यापीठाने बी. ए. पदवी परीक्षा शुल्क 650 रुपये ठरविले आहे. त्याचवेळी तुमकूर विद्यापीठाचे शुल्क 900 रुपये आहे. मुक्‍त विद्यापीठांकडून फेर मूल्यमापनासाठी 1 हजार रुपये आकारले जातात. तर कर्नाटक विद्यापीठात यासाठी 485 रुपये शुल्क आहे.एकरूप शिक्षण पद्धती जारी करण्यामागे अनेक कारणे आहेत. एकाचवेळी पदवी अंतिम परीक्षा झाली, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकाचवेळी प्रवेश प्रक्रिया राबविता येते. विद्यार्थी बाहेर राज्यात शिकावयास जात असतील तर त्यांनाही ते सोयीचे होईल.