Tue, Jan 22, 2019 04:08होमपेज › Belgaon › अनधिकृत बांधकामे, सांडपाणी रोखणार कोण?

अनधिकृत बांधकामे, सांडपाणी रोखणार कोण?

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 11 2018 12:00AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

उपनगर परिसरात अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे. अरुंद जागेत बांधकामांचा पसारा वाढत आहेत. आपत्काळात मोठी हानी होण्याची शक्यता आहे. त्यातच सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे.  या समस्यांचे निवारण होणार का, असा सवाल दक्षिणेतील नगरसेवकांनी उपस्थित केला. याचवेळी विकासकामांत अधिकारी राजकारण करीत असल्याचा आरोप माजी महापौर किरण सायनाक यांनी केला.

बुधवारी सायंकाळी गोवावेस येथील मनपा संकुलात शहर दक्षिण भागातील समस्यांसंदर्भात महापौर संज्योत बांदेकर यांनी प्रशासकीय बैठक बोलाविली होती. बैठकीला आयुक्‍त शशिधर कुरेर, पाणीपुरवठा विभागाचे अभियंते करिअप्पा, स्थायी समितीचे अध्यक्ष संजय सव्वाशेरी आणि राजेंद्र बिर्जे, अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर व सत्ताधारी गटनेते पंढरी परब व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीत दिनेश राऊळ यांनी वडगाव परिसरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला.