Sat, Feb 16, 2019 17:20होमपेज › Belgaon › उमेश कत्ती, ए. बी. पाटील यांचे अर्ज दाखल 

उमेश कत्ती, ए. बी. पाटील यांचे अर्ज दाखल 

Published On: Apr 21 2018 12:59AM | Last Updated: Apr 21 2018 12:03AMहुक्केरी : वार्ताहर   

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार उमेश कत्ती व काँग्रेस पक्षाचे उमेदवार अप्पय्यगौड बसगौड पाटील यांनी समर्थकांसमवेत शुक्रवारी तहसील कार्यालयात निवडणूक अधिकारी व्ही. व्ही. कुलकर्णी यांच्उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवाराबरोबर चारजणांना प्रवेश होता. कोणतीही अनुसूचित घटना घडू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाजपच्यावतीने डमी उमेदवार म्हणून रमेश विश्‍वनाथ कत्ती व काँग्रेसच्यावतीने डमी उमेदवार म्हणून विनय अप्पय्यागौड पाटील यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. 

भाजपचे माजी मंत्री शशिकांत नाईक, गजानन क्वळ्ळी, अप्पासाहेब शिरकोळी, राजेंद्र पाटील, अमर नलवडे, शिवशंकर डंग, गुरप्प तळवार, बसवराज मटगार, गुरू कुलकर्णी, परगौडा पाटील, महावीर निलजगी, अजित करजगी व काँग्रेसच्यावतीने जयप्रकाश नलवडे, श्रीकांत भूशी, अशोक अंकलगी, संजय नष्टी, जितेंद्र मरडी, रवि कराळे, सलिम कलावंत, दिलीप होसमनी, चिदू करवण्णवर, सुधीर पाटील, मुक्तार नदाफ, गंगाधर मुडशी, रेखा चिकोडी आदी उपस्थित होते.

Tags : Belgaum, Umesh Katti, A B Patil, filed, application