Sat, Nov 17, 2018 03:40होमपेज › Belgaon › विजापूर अत्याचाराच्या निषेधार्थ उगारखुर्द येथे विविध संघटनांचा मोर्चा

विजापूर अत्याचाराच्या निषेधार्थ उगारखुर्द येथे विविध संघटनांचा मोर्चा

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 01 2018 11:25PM

बुकमार्क करा
उगारखुर्द : वार्ताहर

विजापूर येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ येथील विविध दलित संघटना, युवा कर्नाटक संघ, ग्रामस्थ, मुस्लिम बांधव यांच्या वतीने निषेध मोर्चा काढून त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी केलेल्या घटनेच्या अवमानाचे वक्‍तव्य तसेच आ. उमेश कत्ती यांच्याकडून झालेल्या दलितांच्या अवमानांचा निषेधही करण्यात आला.

रविवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्कलपासून निघालेला निषेध मोर्चा मुख्य रस्त्यावरून उगार बी. के. सर्कल येथे आल्यानंतर मानवी साखळी करून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी दलित नेते सुभाष कुराडे, मार्शल कुराडे, नंदिनी फटाकडे, अ‍ॅड. व्ही. राव, अ‍ॅड. सालीमनी, रमेश भिर्डीकर, सदाशिव शिंगे, विजय असोदे यांनी मनोगते व्यक्त केली. 

यावेळी रुस्तुम सुतार, सुनंदा नाईक, सचिन शिंगे, सदाशिव शिंगे, लोकेश कांबळे, बी. राव, वासू कांबळे, सुजय फराकटे आदी दलित नेते, मुस्लिम बांधव, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.