Thu, Jul 18, 2019 10:46होमपेज › Belgaon › संमेलनात घुमणार सातार्‍याचा आवाज

संमेलनात घुमणार सातार्‍याचा आवाज

Published On: Jan 19 2018 1:49AM | Last Updated: Jan 18 2018 8:51PMउचगाव : वार्ताहर 

उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित रविवार दि. 21  रोजी होणार्‍या 16 व्या संमेलनाची तयारी पूर्णत्वाला आली असून चार सत्रामध्ये होणार आहे, अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर यांनी दिली. संमेलनाच्या ग्रंथदिंडीमध्ये सातारा येथील झांजपथक सहभागी होणार आहे. 

अकादमीचे पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. संमेलनाला सुमारे तीन ते चार हजार साहित्यप्रेमी जमणार असल्याने त्यांची आसन व्यवस्था, भोजन व्यवस्था या गोष्टीकडे जातीने लक्ष देण्यात येत आहे. तसेच ग्रंथदिंडीचा सोहळा हा उचगाव साहित्य संमेलनाचे आकर्षण असते. याबरोबरच या संमेलनामध्ये उचगाव व चंदगड परिसरातील सतरा माध्यमिक  शाळांमधील विद्यार्थी उपस्थित राहतात.

तिसर्‍या सत्रामध्ये वेंगुर्ले येथील ह.भ.प. देवदत्त परुळेकर यांचे संत साहित्यावर व्याख्यान होणार आहे. चौथ्या व शेवटच्या सत्रामध्ये अहमदनगरचे कथाकार संजय कळमळकर यांचा ‘असायदान’ हा विनोदड कथाकथनपचा बहारदार कार्यक्रम रंगणार आहे. 

यावर्षी संमेलनाचे खास आकर्षण ठरणार आहे ते सातारा जिल्ह्यातील अतित उमरज या भागातील 40 युवकांचे लाठी, झांजपथक सादर करणारे विविध कौशल्ये दाखविणार्‍या ‘छावा युवा मंचच्या’ कलाकारांचे पथक. तसेच या बरोबरच विद्यार्थ्यांच्या लेझीम, टिपरी नृत्य याबरोबरच कल्लेहोळ, तुरमुरी या गावातील झांजपथक भाग घेणार आहेत. या भागातील सर्व वारकरी  भजनी मंडळे, महिला मंडळे यांचाही सहभाग असणार आहे.