Tue, Jan 22, 2019 22:29होमपेज › Belgaon › यूपीएससी परीक्षा : अधिसूचना जारी

यूपीएससी परीक्षा : अधिसूचना जारी

Published On: Feb 09 2018 1:59AM | Last Updated: Feb 08 2018 10:37PMबंगळूर : प्रतिनिधी    

देशातील प्रतिष्ठीत परीक्षा म्हणून ओळखण्यात येणार्‍या यूपीएससी परीक्षेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी 6 मार्च ही अखेरची तारीख आहे.यंदा नेमणूक प्रक्रियेमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आला असल्याचे वृत्त होते. मात्र ही निव्वळ अफवा ठरली आहे.

मागील वर्षाच्या  नियमानुसारच या परीक्षा घेण्यात येणार आहेत.  भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) 782 जागांसाठी व भारतीय वनाधिकारी सेवेच्या (आयएफएस)च्या 110  जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे यूपीएससीने कळविले आहे.