Thu, Jun 20, 2019 21:24होमपेज › Belgaon › काळी नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू

काळी नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू

Published On: Mar 25 2018 1:46AM | Last Updated: Mar 25 2018 1:24AMदांडेली : वार्ताहर

अकोर्डाजवळ (ता. जोयडा) शनिवारी काळी नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला. दोन्ही युवक दांडेलीचे रहिवासी होते. दांडेली टाऊनशीप रहिवासी व वेस्टकोस्ट पेपर मिल रोजंदारी कामगार गणपती जट्टी नाईक (वय 30) व बांबू गेटचा रहिवासी व कारखान्याचा रोजंदारी कामगार यल्लाप्पा नागाप्पा बडकन्नवर (23) अशी दोघांची नावे आहेत. ते दोघे काळी नदीत पोहण्यासाठी उतरले होते. 

दांडेलीचे आठ युवक बिरमपाली गावाजवळ अकोर्डा येथे काळी नदीवर पिकनिकसाठी गेले होते. सकाळी 10 वा.च्या सुमारास अकोर्डाजवळ काळी नदीजवळ पोहोचताच सर्वांनी मिळून जेवण बनवले. त्यानंतर काहींनी मासे पकडण्याचे प्रयत्न केले, तर ते दोघे पोहण्यासाठी उतरले. त्याचवेळी सुपा धरणाचे पाणी सोडण्यात आले होते.

पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने पाण्यात भोवरे तयार झाले आणि त्यात सापडून ते दोघे बुडाले. इतर मित्रांनी घटनेची बुडाल्याची माहिती दांडेली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी राफ्टिंग व्यावसायिकांना पाचारण करून त्या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.

 

Tags : belgaon, Dandeli news, Kali River, youths drown,