Sat, Feb 23, 2019 00:29होमपेज › Belgaon › राज्यात प्रमुख पदावर दोन महिला विराजमान

राज्यात प्रमुख पदावर दोन महिला विराजमान

Published On: Dec 01 2017 12:38AM | Last Updated: Dec 01 2017 12:36AM

बुकमार्क करा

बंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटक राज्यामध्ये प्रशासन व पोलिस खात्याच्या प्रमुखपदी दोन महिलांची नियुक्‍ती झाली आहे. त्याद‍ृष्टीने कर्नाटक देशातील पहिले राज्य ठरले आहे. 1981 आयएएस बॅचच्या अधिकारी के. रत्नप्रभा यांची मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याच्या मुख्य सचिव म्हणून नियुक्‍ती केली. त्यांच्याशिवाय 1983 आयपीएस बॅचच्या पोलिस अधिकारी निलमनी एन. राजू यांची राज्याच्या पोलिस महासंचालक म्हणून नियुक्‍ती केली.

या दोन्ही मुख्य पदावर नियुक्‍ती करताना हा  निर्णय सेवा ज्येष्ठतेनुसार घेण्यात आल्याचे कर्नाटकाने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. कर्नाटकात प्रथमच राज्याच्या मुख्य सचिवपदी व पोलिस महासंचालकपदी महिलांची नियुक्‍ती करून सिद्धरामय्या सरकारने एकप्रकारे महिलासुद्धा राज्याचे प्रशासन चांगल्या तर्‍हेने हाताळू शकतात, हे सार्‍या देशाला दाखवून दिले आहे. या निर्णयाचे राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजप, निजदच्या आमदार व खासदारांनीही केले आहे.