Thu, Jul 18, 2019 04:47होमपेज › Belgaon › राज्यात डेंग्यूचे दोन हजार रुग्ण

राज्यात डेंग्यूचे दोन हजार रुग्ण

Published On: Aug 21 2018 1:31AM | Last Updated: Aug 20 2018 8:02PMबेळगाव : प्रतिनिधी

संततधार पावसामुळे राज्यात सांसर्गिक रोगांचा प्रसार वेगाने होत ओह. मंगळूरसह किनारपट्टीवरील भागात तसेच अतिवृष्टीचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या मलनाड भागात डेंग्यू, चिकनगुनियाचे प्रमाण वाढत आहे. राज्यभरात डेंग्यूचे सुमारे दोन हजार रुग्ण आढळले आहेत. 

गतवर्षी दोन महिन्यात 776 जणांना डेंग्यू आणि 586 जणांना चिकनगुनिया झाल्याचे दिसून आले होते. मंगळूरमध्ये सर्वाधिक 442 प्रकरणांची नोंद झाली होती. मंगळूरमध्ये यंदा 1,581 संशयित डेंग्यू रुग्णांची रक्‍ततपासणी करण्यात आली. त्यापैकी 442 जणांना डेंग्यू झाल्याचे दिसून आले. गेल्या दोनच महिन्यात 358 इतकी रुग्णसंख्या वाढली आहे. 

बंगळूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात 17,821 संशयितांपैकी 313 जणांना डेंग्यू, शिमोग्यात 158, उडपी 156, हासन 152, हावेरी 114 यासह राज्यात 1,907 जणांगा डेंग्यू झाल्याचे निदान करण्यात आले. आतापर्यंत एकूण 18,264 संशयित रुग्ण असून त्यापैकी 12,932 जणांची रक्‍ततपासणी करण्यात आली आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा डेंग्यू रुग्णांची संख्या कमी झाली आहे. 2017 ऑगस्टमध्ये 5,225 डेंग्यू रुग्णांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला होता. यंदा केवळ दोन हजार प्रकरणे दिसून आल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

गतवर्षी राज्यात 12,143 संशयित चिकनगुनिया रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 1,216 जणांना चिकनगुनिया झाल्याचे दिसून आले होते. यंदा 9,576 संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली असून 1,382 जणांना चिकनगुनिया झाल्याचे निदान करण्यात आले आहे.

गेल्या दोन महिन्यांत एकूण 586 जणांना रोगाची लागण झाली आहे. हावेरीत सर्वाधिक 444, चित्रदुर्ग 116, शिमोगा 114, दावणगेरी 100, गुलबर्गा 90 असे रूग्ण आढळून आले आहेत.