Thu, Nov 14, 2019 06:15होमपेज › Belgaon › दोन विद्यार्थ्यांचा नदीत मृत्यू

दोन विद्यार्थ्यांचा नदीत मृत्यू

Published On: Dec 18 2017 2:29AM | Last Updated: Dec 17 2017 10:30PM

बुकमार्क करा

खानापूर : प्रतिनिधी/मच्छे वार्ताहर

हुंचेनहट्टी येथील चर्चच्या वतीने आयोजित सहलीच्या निमित्ताने कांजळे येथे आलेल्या विद्यार्थ्यांचा नदीकाठावर खेळताना व्हॉलीबॉल पाण्यात गेला. तो काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या दोघा विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली.

जेम्स जॉन डिसोजा (वय 16, रा. मच्छे) आणि रोहन रोझारिओ डिक्रूझ (13 रा. हुंचेनहट्टी) अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. नाताळला अवघे आठ दिवस  असताना घडलेल्या दुर्घटनेने मच्छे आणि हुंचेनहट्टी परिसरावर शोककळा पसरली.

हुंचेनहट्टी येथील डिव्हाईन मर्सी चर्चच्या वतीने प्रार्थनेसाठी येणार्‍या विद्यार्थ्यांकरिता सहलीचे आयोजन केले जाते. रविवारी सकाळी 120 विद्यार्थी-विद्यार्थिनींसह चर्चचे प्रमुख फा. फ्रँकी लोबो खानापूर तालुक्यातील हरसनवाडी चर्चजवळ दाखल झाले. तेथे प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थी बाजूला खेळण्यात मग्न झाले.