Sun, Apr 21, 2019 05:58होमपेज › Belgaon › शिक्षण स्थायी अध्यक्षपदी गोरल

शिक्षण स्थायी अध्यक्षपदी गोरल

Published On: Jul 24 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 11:31PMबेळगाव : प्रतिनिधी

चार महिन्यांपासून प्रलंबित असणारी जि. पं. स्थायी समितींची निवड प्रक्रिया सोमवारी जि. पं. सभागृहात राबविण्यात आली. तीन स्थायी समितींच्या अध्यक्ष व इतर सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी इच्छुक सदस्यांची संख्या अधिक होती. यामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. आपल्या पाठीराख्यांना स्थायी समितीमध्ये वर्णी लावण्यासाठी आमदारांनीही प्रयत्न चालविले होते. त्यामुळे निवडीकडे लक्ष लागून राहिले होते.

मंत्री रमेश जारकीहोळी, आ. विवेक पाटील यांनी याबाबत यशस्वी तोडगा काढत बिनविरोध निवड करण्यात यश मिळाले. सकाळी 10.30 वा कामकाजाला सुरुवात होताच इच्छुकांनी अर्ज दाखल केले. यामध्ये शिक्षण आणि आरोग्य शिक्षण स्थायी समितीमध्ये इच्छुकांची संख्या अधिक होती. यामुळे चुरस निर्माण झाली होती. मात्र, जारकीहोळी यांनी यशस्वी तोडगा काढत बिनविरोध निवडी पार पडल्या.

म. ए. समितीच्या दोन सदस्यांना स्थायी समितीमध्ये संधी देण्यात आली. हिंडलगा जि. पं. सदस्या माधुरी हेगडे यांची अर्थ लेखा स्थायी समिती, तर गर्लगुंजी सदस्य परशराम कार्वेकर यांची सामान्य स्थायी समिती सदस्यापदी वर्णी लागली. यावेळी आ. गणेश हुक्केरी, आ. विवेक पाटील, आ. महेश कुमठळ्ळी, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, सहाय्यक कार्यकारी अधिकारी एस. आर.मुळ्ळळ्ळी उपस्थित होते.