Wed, Mar 20, 2019 12:45होमपेज › Belgaon › कार झाडावर आदळून दोघे ठार

कार झाडावर आदळून दोघे ठार

Published On: Dec 05 2017 1:49AM | Last Updated: Dec 04 2017 10:46PM

बुकमार्क करा

जमखंडी ः वार्ताहर

कार झाडावर आदळून दोघे जागीच ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना जमखंडी तालुक्यातील मुधोळ रोडवर रविवारी सायंकाळी घडली. सौंदत्ती येथे देवदर्शन करून परतत असताना हा अपघात झाला. 

अर्जुन अशोक डवरी (29), अशोक संभाजी संपाळ (25) हे दोघे जागीच ठार झाले. तर विनोद वाघमोडे, सहजानंद बळोलगिडद व नागराज कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता विजापूर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त सर्व जमखंडी परिसरातील आहेत.

सौंदत्ती येथे देवदर्शन व जत्रा आटोपतून जमखंडीस मुधोळमार्गे कारने (केएए 29 झेड 4843) परतत असता हा अपघात घडला. कार भरधाव वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटून कार रस्त्याकडेला असलेल्या झाडाला धडकली व त्यात कारचा चक्काचूर झाला व झाड मोडून पडले. घटनास्थळी जमाव जमा झाला व त्यांनी मदत कार्य सुरू केले. रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना विजापूरला हलविण्यात आले. घटनास्थळी जमखंडी सीपीआय अशोक सदलगी, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीएसआय पुंडलिक पटातर यांनी भेट दिली.