Thu, Apr 25, 2019 08:10होमपेज › Belgaon › नक्षलवादी हल्ल्यात कर्नाटकातील दोन जवान शहीद

नक्षलवादी हल्ल्यात कर्नाटकातील दोन जवान शहीद

Published On: Jul 10 2018 11:05AM | Last Updated: Jul 10 2018 11:05AM  बेळगाव जिल्‍ह्यातील एक जवान

खानापूर: प्रतिनिधी 

बस्तर (छत्तीसगड) विभागातील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद झाले आहेत. संतोष लक्ष्मण गुरव (वय २७) आणि विजयानंद नायक अशी शहीद जवानांची नावे आहेत. संतोष गुरव हे (हलगा ता. खानापूर) येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी तीन बहिणी आहेत.

सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हे दोन्ही जवान दुचाकीवरून गस्त घालत असतानाच ताडबाऊली गावाजवळ झालेल्या आयईडी स्फोटात दोघेही गंभीररित्या जखमी झाले. या दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती नक्षलवाद विरोधी विभागाचे महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिली. बीएसफने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईने नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला. 
संतोष हे पाच वर्षांपूर्वी बीएसएफमध्ये दाखल झाले होते. तीन महिन्यांपूर्वी सुटीवर गावी येऊन गेले होते.