Tue, Mar 19, 2019 03:58होमपेज › Belgaon › दोन कोटी सत्तर लाख रुपयांचा धनादेश खोटा

दोन कोटी सत्तर लाख रुपयांचा धनादेश खोटा

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 09 2018 12:57AMबेळगाव : प्रतिनिधी

हनुमाननगर एसबीआय बँकेच्या शाखेत 2 कोटी 70 लाखांचा देण्यात आलेला धनादेश बोगस असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. एपीएमसी पोलिस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले पथक तपासासाठी लखनौला गेले आहे.  

फेब्रुवारीमध्ये हनुमाननगर येथील एसबीआयच्या शाखेत उत्तर प्रदेश सरकारच्या नावाने नरेगा योजनेतील 2 कोटी 70 लाखांचा धनादेश वटविण्यासाठी देण्यात आला होता. धनादेश उत्तर प्रदेश सरकारच्या नावाने लखनौ येथील नरेगा कार्यालयाचा होता. धनादेश दिलेल्या व्यक्तीबाबत संशय आल्याने बँकेच्या व्यवस्थापकांनी एपीएमसी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली होती. यावरुन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी हाती घेतली होती. 

एपीएमसी स्थानकात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.  उर्वरित तिघांचा शोध सुरु आहे. यातील एकजण दुबईत तर दुसरा तामिळनाडू येथे असल्याचे तपासातून पुढे आले आहे. सदर धनादेश उत्तर प्रदेश सरकारचा नसल्याची माहिती पथकाला उत्तरप्रदेशातील संबंधित अधिकार्‍यांकडून देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे सदर धनादेश बोगस असल्याचे स्पष्ट झाले.