Mon, May 25, 2020 22:08होमपेज › Belgaon › दोन मुलांना विहिरीत फेकून बापाची आत्महत्या

दोन मुलांना विहिरीत फेकून बापाची आत्महत्या

Published On: Jan 05 2018 1:05AM | Last Updated: Jan 04 2018 11:32PM

बुकमार्क करा
गुलबर्गा : प्रतिनिधी

चिंचोळी तालुक्यातील होददल्ली गावामध्ये  रंगय्या (वय 30) याने पत्नीबरोबर झालेल्या भांडणामुळे गुरुवारी आपल्या दोन मुलांना खुल्या विहिरीत फेकून देऊन स्वत:ही गळफासाने आत्महत्या केली. शिवकुमार (वय 5) व श्रीकंठ (वय 2) अशी त्या मुलांची नावे आहेत.  

 क्षुल्लक कारणावरून पत्नी सरस्वतीबरोबर रंगय्याचे कडाक्याचे भांडण झाले. त्याने आपल्या पत्नीला माहेरला पाठवून दिले. आपल्या दोन्ही मुलांना गावच्या बाहेर असलेल्या एका विहिरीकडे घेऊन गेला व त्या दोन्ही मुलांना विहिरीत फेकून दिले. त्यामुळे दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर विहिरीजवळ असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन त्याने स्वत:ही आत्महत्या केली.  या प्रकरणी सुलेपेठा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.