Wed, Apr 24, 2019 01:44होमपेज › Belgaon › हारुरीजवळ रेल्वेच्या धडकेत दोन गवे ठार

हारुरीजवळ रेल्वेच्या धडकेत दोन गवे ठार

Published On: Mar 22 2018 1:52AM | Last Updated: Mar 22 2018 1:48AMखानापूर : प्रतिनिधी

हारुरीजवळ (ता.खानापूर)  रेल्वे रूळ ओलांडणार्‍या  दोन गव्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेसने या गव्यांना धडक दिली. त्यात एक गवा जागीच ठार झाला. तर दुसरा गवा सुमारे एक किलोमीटर फरफटत गेला. 

या महिन्यातील ही दुसरी घटना असून रेल्वे व वनखात्याडून अद्याप कोणत्याच उपाययोजना हाती आलेल्या नाहीत. यापुढे तरी वन खाते रेल्वे प्रशासनाकडून दखल घेतली जाणार का, असा प्रश्‍न आहे.  

तालुका पशू संगोपन अधिकारी डॉ. जी. पी. मनगुळी यांनी पंचनामा केला. घटनास्थळी उपवनक्षेत्रपाल सी. बी. पाटील,  वनक्षेत्रपाल एस. एस. निंगाणी व सहकारी उपस्थित होते. दोन महिन्यांपूर्वी एका हत्तीचाही रेल्वेच्या धडकेत बळी गेला होता.