Sun, Apr 21, 2019 13:47होमपेज › Belgaon › अल्पवयीनासह दोन दुचाकी चोरट्यांना अटक

अल्पवयीनासह दोन दुचाकी चोरट्यांना अटक

Published On: May 29 2018 1:44AM | Last Updated: May 29 2018 1:01AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरामध्ये ठिकठिकाणी दुचाकींची चोरी करून धुमाकूळ घातलेल्या दोघा चोरट्यांना अटक करण्यात खडेबाजार पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक अल्पवयीन असून सुरेश लक्ष्मण हुल्यागोळ रा. बेनकनहोळ्ळी (ता. हुक्केरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहेत. एकाची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर अल्पवयीनची बालसुधारणा गृहात रवानगी करण्यात आली आहे. 

खडेबाजार पोलिस स्थानकातील व्याप्तीसह शहरातील विविध ठिकाणी 7 दुचाकींची चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून सदर दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत 1 लाख 88 हजार आहे. काही दिवसांपूर्वी बापट गल्ली येथे दुचाकी चोरताना चोरटा रंगेहात पकडण्यात आला होता. यावरून सदर चोरट्यांचा तपास लावण्यास पोलिसांना मदत झाली आहे. बापट गल्ली येथील दुकानदाराची दुचाकी चोरी करीत असताना एकाला नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांची छबी कैद झाली होती. यावरुन खडेबाजार पोलिस स्थानकाच्या गुन्हे विभागाने चोरट्यांचा तपास लावून अटक केली आहे.