Mon, Jul 22, 2019 01:06होमपेज › Belgaon › आकाशात विमानांची धडक सुदैवाने टळली

आकाशात विमानांची धडक सुदैवाने टळली

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 11:16PMबंगळूर : प्रतिनिधी

बंगळूरनजीक आकाशात इंटरग्लोब एविएशन एअरलाईनच्या दोन इंडिगो विमानांची अवकाशात होणारी धडक सुदैवाने टळली. या दोन्ही विमानांमधील 328 प्रवासी बालंबाल बचावले. हा थरार मंगळवारी झाला. दोन विमाने 200 फूट अंतरावर 10 जुलै रोजी कोईमतूरहून हैदराबादला (6 ई 779), तर दुसरे विमान बंगळूरहून कोचीला (6ई 6505) जाणार होते.  एक विमान 27 हजार 300 फुटांवर, तर दुसरे विमान 27 हजार 500 फूट उंचीवर होते. दोन्ही विमानांमध्ये चार नॉटिकल मैलाचे अंतर होते. त्यावेळी ट्रॅफिक कंट्रोलरने एक विमान 36 हजार फुटांवर घेण्यास सांगितले.  एक विमान 27 हजार 300 फुटांवर, तर दुसरे विमान 27 हजार 500 फूट उंचीवर होते. 

इंडिगोच्या माहितीनुसार हैदराबादच्या फ्लाईटमध्ये 162 प्रवासी, तर कोचीच्या फ्लाईटमध्ये 166 प्रवासी होते. दोन्ही विमाने फक्‍त 200 फूट एकमेकांपासून लांब होते. यावेळी ट्रॅफिक कॉलिजन एवॉयडेंस सिस्मट (टीसीएएस)चा अलार्म वाजला आणि ही दुर्घटना होता होता वाचली. ही यंत्रणा विमानातील कॉकपिटमध्ये जागृती करते व संभाव्य घटनेची कल्पना देते. एयरक्राफ्ट एक्सिडेंट इन्वेस्टिगेशन बोर्ड या प्रकरणाची चौकशी करत आहे.