Thu, Jul 18, 2019 06:29होमपेज › Belgaon › प्रथम पाच मतदारांना मिळणार मतदानाची दोनदा संधी

प्रथम पाच मतदारांना मिळणार मतदानाची दोनदा संधी

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:21AMबेनाडी : वार्ताहर

मतदान प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदा 12 मे रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सुरुवातीस येणार्‍या प्रथम पाच मतदारांना दोनदा मतदान करण्याची संधी मिळणार आहे. त्यापैकी एक ट्रायल आणि एक हक्‍काचे मतदान असणार आहे.

मतदान यंत्रातील बिघाड, टाकलेले मतदान संबंधित उमेदवारास न मिळणे, दुसर्‍या बटणासमोर मतदान होणे असे  अनेक  प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्याची दखत घेत यंदा नवीन प्रयोग केला जात आहे. मतदान झाल्यानंतर मतदानयंत्रे त्या केंद्रातील प्रमुख निवडणूक अधिकार्‍याकडे सुपूर्द करून सर्वांसमोर सीलबंद करण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर हा उपक्रम उमेदवारांच्या एजंटांच्या उपस्थितीत सकाळी 6 ते 7 या वेळेत होणार आहे. ट्रायल मतदानावेळी बोटाला शाई न लावता अथवा मतदार यादीत नोंदणी न करता उपक्रम राबविला जाईल. सर्व उमेदवारांना ट्रायल 5 मते देऊन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 7 पासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात होणार आहे.

याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी देशातील अनेक ठिकाणी विद्युत मतदान यंत्रांबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची गांभीर्याने दखल घेत निवडणूक आयोगाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याबाबत जागृतीही करण्यात येत आहे. आतापर्यंत विविध सार्वजनिक ठिकाणी मतदान यंत्रे आणि व्हीव्ही पॅट यंत्रांबाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आहेत.