Mon, Aug 19, 2019 09:43होमपेज › Belgaon › अबब...साडेबारा फूट किंग कोब्रा

अबब...साडेबारा फूट किंग कोब्रा

Published On: Mar 22 2018 1:52AM | Last Updated: Mar 22 2018 1:45AMदांडेली : वार्ताहर

हल्याळ तालुक्यातील गोबराळ येथे साडेबारा फूट लांब आणि 16 किलो वजनाचा किंग कोब्रा (कलिंग) आढळला. दांडेलीतील सर्पमित्र रजाक शहा यांनी त्याला पकडले आणि जंगलात सोडून दिले.

गोबराळ येथील अभियंता शेख यांच्या फार्महाऊसमध्ये किंग कोब्रा आढळल्यानंतर याबाबत सर्पमित्र रजाक शहा यांना कळविण्यात आले. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या शिताफीने किंग कोब्राला पकडले.

रजाक शहा यांनी यापूर्वी दांडेली कुळगी, कुंभारवाडा, हरेगाळी, प्रधान आदी भागात यापूर्वी  किंग कोब्रा सर्पांना पकडून जंगलात सोडले आहे.

दोन वर्षापूर्वी कुंभारवाडा येथे झाडावर किंग कोब्रा आढळला होता. अरण्य विभागाच्या कर्मचार्‍यांनीही त्याला पकडण्यास नकार दिला होता. 15-20 फूट उंचावर असलेल्या सापाला पकडणे अत्यंत धोक्याचे असते. परंतु शहा यांनी झाडावर चढून शिताफीने किंग कोब्राला पकडले होते.