Thu, Apr 25, 2019 17:33होमपेज › Belgaon › सुभाषनगर दरोडाप्रकरणी दोघांना अटक

सुभाषनगर दरोडाप्रकरणी दोघांना अटक

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 10 2018 12:24AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी 

सुभाषनगर दरोड्याप्रकरणी पोलिसांनी आज दोन युवकांना अटक केली. महिलेच्या तोंडात गोळा कोंबून हा दरोडा टाकण्यात आला होता. नदीम हुसेनखान देसाई (वय 26), मोदीनसाब  रफिकअहमद अत्तार (वय 33, दोघे रा.सुभाषनगर) दुसरा क्रॉस अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मार्केट पोलिस स्थानकाच्या व्याप्‍तीत येणार्‍या सुभाषनगरासह विविध भागांत झालेल्या चोर्‍यांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या या दोन संशयितांकडून 163 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1 लाख 34 हजार 110 रु.असा मुद्देमाल  जप्‍त करण्यात आला आहे. पोलिस आयुक्‍त डी.सी.राजप्पा, एस.पी.सीमा लाटकर, उपायुक्‍त अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी शंकर मारिहाळ पोलिस निरीक्षक प्रशांत.एस, विश्‍वनाथ माळगी एम.एस.चावडी, आर. एम. कनकरेड्डी यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला होता.