Fri, Jul 19, 2019 18:03होमपेज › Belgaon › सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न

सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न

Published On: Mar 15 2018 1:17AM | Last Updated: Mar 14 2018 8:29PMएकसंबा: वार्ताहर

राज्य सरकारने कोणताही भेदभाव न करता सर्वच समाजाला समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही जातीचा वापर करुन एकमेकात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही, असे प्रतिपादन सार्व. बांधकाम खात्याचे मंत्री एस.सी महादेवप्पा यांनी केले.

कल्लोळ येथे कल्लोळ- येड्डुर बंधारा निर्मिती कामकाजाचा शुभारंभ आणि सदलगा येथील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या प्रवासी मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. गणेश हुक्केरी तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. प्रकाश हुक्केरी उपस्थित होते.

महादेवप्पा पुढे बोलताना म्हणाले, विरोधकांनी कोणत्याही गोष्टींवर टीका करताना आपण जे भाष्य करतो त्यामध्ये तथ्य आहे का, याची तपासणी करुन घ्यावी. आमच्या सरकारने विविध भाग्य योजनेंतर्गत सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास साधला आहे. पाच वर्षाच्या कार्यकाळात सुमारे 42 हजार किमी रस्त्यांची सुधारणा करण्यात सिध्दरामय्या सरकार यशस्वी झाले आहे.प्रारंभी एस. सी महादेवप्पा यांच्याहस्ते नामफलकाचे अनावरण करुन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक राज्य द्राक्षरस महामंडळाचे अध्यक्ष रविंद्र मिरजे यांनी केले.

खा. प्रकाश हुक्केरी म्हणाले,  विविध भाग्य योजनांसह सर्वसामान्य जनतेचे सरकार म्हणून लोकप्रिय ठरलेल्या काँग्रेस सरकारने सर्वांगीण विकास साधला आहे. राज्यातील कित्येक दिवसांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या रस्त्यांच्या विकासाचे भाग्य ही महादेवप्पा यांनी मिळवून दिले आहे. आ. गणेश हुक्केरी यांनीही चिकोडी-सदलगा मतदार संघासाठी दिलेल्या विकासातील योगदानाचा आढावा घेत तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने आम्ही अधिक कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.  यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महावीर मोहिते, जि.पं. सदस्य सुदर्शन खोत, अनिल पाटील, चिकोडीचे माजी नगराध्यक्ष रामा माने, पिरगोंडा पाटील, एल.बी.खोत, संतोष नवले, रामचंद्र मडिवाळे, विरुपाक्ष झोंड, नेजचे मारुती सुतट्टी, राजु पाटील, संजय खिराई, पुंडलीक खोत, राजेंद्र कराळे  आदी उपस्थित होते.