Sun, Feb 24, 2019 00:33होमपेज › Belgaon › सीमावासीयांचे दुखणे निपाणीत मांडण्याचा प्रयत्न

सीमावासीयांचे दुखणे निपाणीत मांडण्याचा प्रयत्न

Published On: Apr 23 2018 1:14AM | Last Updated: Apr 23 2018 12:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी

उद्या निपाणी येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने जात आहे. त्याठिकाणी बोलण्याची संधी आहे. सीमा भागातील जनतेचे दुखणे काय आहे, ते स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. विविध कार्यक्रमांनिमित्त रविवारी कोल्हापुरात दाखल झालेल्या पवारांनी दुपारी मध्यवर्ती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. चर्चेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, सीमा भागातील जनता गेली 65 वर्ष एकाच विषयावर आंदोलन करत आहे. यासाठी तेथील जनतेचा मोठा त्याग आहे. या प्रश्‍नांसाठी काहींनी हुतात्मे पत्करले आहे, अशा जनतेच्या मागे राहणे हे आपले कर्तव्य आहे. यामुळे मध्यवर्ती एकीकरण समितीच्या उमेदवार ज्या मतदार संघात उभे करण्यात आले आहेत, त्या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार उभा केला जाणार नाही. 

सीमाभागात समिती उमेदवारांसाठी राष्ट्रवादीकडून अनेक प्रचारसभा घेतल्या जातील, कोल्हापूर जिल्ह्यातून आ. हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडीक,के.पी.पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी या तीन मतदार संघात जाऊन प्रचार करतील, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला, खा. धनंजय महाडिक, आ. हसन मुश्रीफ, के.पी.पाटील, आर.के.पोवार, राजू लाटकर, किसन कल्याणकर यांच्यासह आ. अरविंद पाटील, दीपक दळवी, निंगोजी हुंद्दार, एल.आय.पाटील, राजू मरवे, मारुती मरगाण्णाचे, दिनेश ओऊळकर, राजू ओऊळकर, देवाप्पा गुरव आदी उपस्थित होते.

Tags : Belgaum, Trying, fix, pain, border, people