Sat, Nov 17, 2018 22:39होमपेज › Belgaon › आंबोली घाटात 500 फूट खोल दरीत ट्रक कोसळला

आंबोली घाटात 500 फूट खोल दरीत ट्रक कोसळला

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 08 2018 11:02PMआंबोली : वार्ताहर

सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक आंबोली मुख्य धबधब्यापासून दोनशे मीटर अंतरावर 400 ते 500 फूट खोल दरीत कोसळला. घाटात केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. मालवाहू ट्रक साईडपट्टीचा अंदाज न आल्याने साईडपट्टीवरून कोसळून खोल दरीत कोसळला.

हा अपघात बुधवारी सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास घडला. घाटात दाट धुके असल्यामुळे खोल दरीत कोसळलेला ट्रक दिसून येत नव्हता. अपघातानंतर आंबोली आपत्कालीन पथकाने दरीत उतरून शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान, या अपघातात ट्रकच्या चालकाबाबत कोणतीच माहिती मिळू शकली नाही. सावंतवाडीहून  आंबोलीच्या दिशेने सायंकाळी मालवाहू ट्रक जात होता. मुख्य धबधब्यापासून सुमारे 200 मीटर अंतरावर आल्यावर समोरून येणार्‍या अज्ञात वाहनाने हूल दिल्याने ट्रक संरक्षक कठडा तोडून दरीत कोसळला. या अपघातात ट्रकचे तीन तुकडे झाल्याचे समजते. दरम्यान, दाट धुके असल्यामुळे ट्रकचा चालक बचावला की मृत झाला, हे समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच आंबोली आपत्कालीन पथकाने दरीत उतरून शोधमोहीम हाती घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.