होमपेज › Belgaon › आता टोल भरा मोबाईलद्वारे

आता टोल भरा मोबाईलद्वारे

Published On: Apr 27 2018 12:52AM | Last Updated: Apr 26 2018 9:01PMसंकेश्‍वर : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गावरील टोल भरण्यासाठी लवकरच अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. येत्या काही दिवसांतच मोबाईलवरून टोल भरण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांचा त्रास कमी होऊन त्यांचा वेळही वाचणार आहे.

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी थांबावे लागते. काही ठिकाणी वाहनांच्या गर्दीमुळे वाहनचालकांचा वेळ वाया जातो. त्यामुळे  इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होतो. तसेच काहीवेळा टोल भरण्यावरून कर्मचार्‍यांशी वादावादीच्या घटना घडत असतात. मात्र आता मोबाईलवरून टोल भरण्याची सविधा उपलब्ध होणार असल्याने वाहनचालकांना सोयीस्कर होणार आहे.

मोबाईलवरून टोल भरण्याची ही सुविधा ज्या मोबाईलला प्रीपेड वॉलेट, क्रेडीट कार्ड किंवा बँकेचे खाते जोडल्यास मिळू शकणार  आहे. त्यामुळे टोलनाक्यावरुन वाहन जाताच संबंधितांच्या खात्यातून टोलची रक्‍कम आपोआप वजा होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान टोल नाक्यावर थांबण्याची आवश्यकता भासणार नाही.

मोबाईलला बँक खाते जोडल्यास त्या वाहनावर समोर फास्ट टॅग लावण्यात येईल त्यामुळे संबंधित गाडी टोल नाक्यावर आल्यास तेथील कॅमेर्‍यांमध्ये रेकॉर्डिंग होऊन संबंधित वाहनमालकाच्या खात्यावरून रक्‍कम आपोआप वजा होईल. त्यामुळे वाहन थांबवून टोल भरण्याची कटकट कमी होणार आहे. तसेच वाहनचालकांनाही सोयीस्कर होणार आहे. मात्र यासाठी बँके खाते मोबाईलला जोडणे आवश्यक आहे. 

सरकरतर्फे लवकरच मोबाईलद्वारे टोल भरण्याच्या सुविधेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. रोज महामार्गावरू प्रवास करणार्‍या प्रवाशांना मोबाईल टोल सुविधा सोयीस्कर ठरणार आहे. 

 

Tags : belgaon, Sankeshwar news, Toll Filled, mobile,