Fri, Jan 18, 2019 23:23होमपेज › Belgaon › राज्यसभेसाठी आज मतदान,  ७ बंडखोरांना मतदानाचा अधिकार

राज्यसभेसाठी आज मतदान,  ७ बंडखोरांना मतदानाचा अधिकार

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:01AMबंगळूर : पुढारी ऑनलाईन

राज्यसभेच्या चार जागांसाठी उद्या शुक्रवारी विधानसभेत मतदान होईल. काँग्रेसच्या दोन जागा आणि भाजपची एक जागा निवडून येण्याचे निश्चित आहे. उर्वरित एका जागेसाठी तीव्र लढत होणार आहे. दरम्यान, निजदच्या 7 बंडखोर आमदारांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.

निधर्मी जनता दलाच्या 7 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व अपात्र प्रकरणाशी संबंधित उच्च न्यायालयाने बजावलेल्या समन्सला वकिलांमार्फत  उत्तर देण्यात येईल, असे विधानसभा सभापती के.बी.कोळीवाड याुनी म्हटले आहे.  याप्रकरणी वकिलाची नेमणूक करून उच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल. त्यानंतर विधानसभा सचिव उच्च न्यायालयात जावून उत्तर देतील.

 

Tags : Rajya Sabha, Election, rebel Candidates, voting,