Wed, Jan 23, 2019 06:28होमपेज › Belgaon › खानापुरात आज ‘पुढारी’चा वर्धापनदिन

खानापुरात आज ‘पुढारी’चा वर्धापनदिन

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 06 2018 11:17PM

बुकमार्क करा
खानापूर : प्रतिनिधी

निर्भीड आणि निःपक्ष पत्रकारितेचा वारसा जपणार्‍या दै. ‘पुढारी’च्या खानापूर तालुका संपर्क कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी शिवस्मारक सभागृहात स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

‘पुढारीकार’ पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन केले जाणार आहे. ‘पुढारी’चे वाचक, हितचिंतक, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10. 30 ते दु. 2 या वेळेत स्नेहमेळावा होणार आहे. ‘बदलते खानापूर’ या विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे. सोहळ्याला वाचक, हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘पुढारी’ परिवाराने केले आहे.