Mon, Aug 26, 2019 12:57होमपेज › Belgaon › आज निपाणीत बंद

आज निपाणीत बंद

Published On: Jan 05 2018 1:05AM | Last Updated: Jan 04 2018 11:29PM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. 5) येथील बहुजन समाजाच्या वतीने निपाणी बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर चिकोडीचे उपअधीक्षक बी. एस. अंगडी यांच्या मागदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

सकाळी 9 वा. जत्राट वेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून निषेध मोर्चा निघणार असून, शहरातील  प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा निघून तहसीलदार कार्यालय येथे गेल्यावर निवेदन दिले जाणार आहे. पोलिस प्रशासनाने चिकोडी विभागातील सदलगा, अंकली, चिकोडी, चिकोडी ट्रॅफिक तसेच राज्य राखीव दलाच्या पोलिस तुकडीला बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. शुक्रवारी निपाणी शहरासह ग्रामीण भागातील बेनाडी येथेही बंद पाळला जाणार आहे.