Tue, Apr 23, 2019 01:34होमपेज › Belgaon › टिळकवाडीत २० किलोचे ‘नांगरचिन्‍न’

टिळकवाडीत २० किलोचे ‘नांगरचिन्‍न’

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 11 2018 11:56PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

टिळकवाडी महात्मा गांधी कॉलनी येथील शिवानंद रेवणकर यांनी आपल्या शेतातून 20 किलो वजनाचे नांगरचिन्‍न घेतले आहे. 

नांगरचिन्‍न औषधी असून त्याची भाजीही रुचकर लागते. रेवणकर यांनी चार वर्षांपूर्वी आपल्या शेतात नांगरचिन्‍नाचे बी घातले होते. हे कंदमूळ 30 इंच लांब असून वजनाला सुमारे 20 किलो इतके आहे. उपवासालादेखील याचा वापर केला जातो. नांगरचिन्ह सहसा इतके मोठे होत नाही. यामुळे ते दुर्मीळ आहे, अशी माहिती रेवणकर यांनी दिली.